प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday 3 March 2021

शब्द झालेत एकाकी

 

शब्द झालेत एकाकी 


माझे शब्द झालेत एकाकी , पुनवेच्या च॑द्रा सारखे.

वाटले जरी गोड ,पण कविता हरवली आहे.

च॑द्र रडतो पुनवेला नी चा॑दण्या अवसेला

जग रमले सौ॑दर्यात न चाड याची आहे

माझे शब्द झालेत एकाकी,नि कविता हरवली आहे.



अजय सरदेसाई (मेघ)

३/३/२०२१

६:५५ PM