प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 29 May 2021

मै शून्य हूँ , तू पूर्ण कर - २

माझे स्नेही डॉ घनश्याम बोरकर यांच्या त्याच नावाच्या कविते वरून मला ही स्फुरलेली ही कविता ( नव्हे प्रार्थना म्हणाना ).ही कविता जरी आज मी लिहिली असली तरी सर्व श्रेय डॉ घनश्याम बोरकर यांचेच आहे कारण ते ह्या कवितेचे खरे मूळ कवी आहेत . त्यांनी लिहिलेली कविता बाजूला दलाली आहे .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹मै शुन्य हूँ , तू पूर्ण कर🌹

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


तू रौशनी ब्रम्हांड की , मैं रौशनी का मुसाफ़िर I
अस्तित्व मेरा तुझसे हैं , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II 

तू हैं कैवल्य की चांदनी और मैं प्यासा चकोर I 
यह प्यास बुझा ऐ ईश मेरे , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II
 
षडरिपूओं से मन लिप्त पड़ा , पञ्च भूतों का शरीर मेरा I 
इसे निर्मल बना , शुद्ध कर , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II 

कलि-संक्रमण का हैं चरम शिखर और धर्म उसके प्रभाव में I 
पतन से तू मुझे बचा , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II 

उस ह्रदय की इस ह्रदय से न छुपीं कोई भी बांत रहें I
इन्हे जोड़ दे तू एक कर , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II 

तेरी इच्छा में ही मेरी इच्छा रहें , तृष्णा से मन शांत रहें I 
बुद्धि मेरी तू विमल कर ,मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर II 

ह्रदय कवँल हो निवास तेरा और दिव्या गूंज हो सहस्रार में I 
नागिन उठी मूलाधार से , तू अमृत पीला , अब न दूर कर II

मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर , मैं शुन्य हूँ , तू पूर्ण कर  II


शनिवार २९/५/२०२१, ४:१० PM

अजय सरदेसाई (मेघ)



अजय सरदेसाई (मेघ )

२९/५/२०२१ - ४:१० PM

Monday 24 May 2021

स्वप्नांचा व्यापारी

 


        मी  एक  व्यापारी स्वप्नांचा

स्वप्न विकणे हे माझे काम I

छोटी मोठी ,सुंदर अवखळ

विकतो घेऊनि त्यांचे दाम II

 

दुकानांत माझ्या स्वप्नांच्या राशी                       

नीट मांडल्या आहेत कपाटी I

या पहा नी घेऊन जा 

स्वप्न ,जे  आवडे  तुमच्या  मानसी II

 

स्वप्नांची माझ्या न मोठी किंमत

आहे की नाही ही गंमत जंमत I

या या लवकर सारे या 

स्वस्त स्वप्ने खरीदून न्या II

 

पण जरा थांबा , सावधान !

बाहेर लावलेला तक्ता वाचा I

विकलेली स्वप्नं आम्ही घेत नाही परत 

घेताना तुमची अक्कल कुठे होती चरत II

 

अजय सरदेसाई  ( मेघ ) 

२४/५/२०२१ - ४:३३ PM

Tuesday 18 May 2021

मुक्ती – (दोन घटना या लघु कथेचा चा पूर्वार्ध )




CADRC -क्लिव्हलँड अल्झायमर्स डिसिज
  रिसर्च सेन्टर ,एक अल्झायमर्स डिसिज  क्षेत्रात काम करणारी जगदमान्य संस्था . डॉ. जगन्नाथ सुखठणकर, वय वर्ष 45 , हे भारतीय वंशाचे तेथील नामांकित रिसर्च  फेलो .

काल रात्रीपासूनच जगन्नाथाची तब्येत ढासळली होती .त्याला तातडीने आय.सी.यु त शिफ्ट केले होते . डॉ. इंगे गृन्दके  हेड ऑफ  न्यूरो -इम्युनोलॉजी स्वताः  जातीने सर्व उपचार पाहत होत्या .

डॉ. इंगेंचा जगन्नाथ हा अत्यंत आवडता शिष्य आणि न्यूरो -इम्युनोलॉजी रिसर्च सहयोगी सुद्धा. डॉ. इंगें यांनी स्वताः २०० हुन अधिक संशोधन पर प्रभंध लिहिले होते . पण जगन्नाथ वर व त्याच्या प्रतिभेवर त्या खूप प्रभावित होत्या.

जगन्नाथ सुखठणकर २००९ जुलै ला भारतातून क्लिव्हलँड ला आला, न्यूरो -इम्युनोलॉजी आणि अल्झायमर्स वर त्याचे संशोधन पुढे नेण्या साठी आणि इकडचाच झाला.  छोटेसेच कुटुंब होते त्याचे. तो, त्याची बायको मृण्मयी आणि त्यांचा लहान  २ वर्षाचा मुलगा सौम्य .

आज ह्या गोष्टीला १० वर्ष उलटून गेली पण आजही इंगेला जणू हे काल झाल्या सारखे स्पष्ट आठवत होते . हळू हळू इंगे आणि सुखठणकर कुटूंबियांचे समंध घरच्या सारखे कधी झाले हे इंगे ला ही कळले नाही . इंगेला जणू तिचा गेलेला छोटा भाऊ आलबेर्ट च जगन्नाथ मध्ये दिसे आणि जगन्नाथ ला सुद्धा त्याला नसलेली मोठी बहीण मिळाली होती .

इंगे विचार मग्न होती . तिला आजही तो दिवस आठवत होता .११ ऑगस्ट २०११. जगन्नाथला जेमतेम दोनच वर्ष CADRC मध्ये पूर्ण झाली होती. त्याच्या न्यूरो -इम्युनोलॉजी मधल्या संशोदनाबद्दल आणि उल्लेखानीय कामा बद्दल त्याला डॉ. जावेन खाचात्युरीयन अवॉर्ड ने विभूषित करण्यात आले होते .वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हा बहुमान मिळवणारा CADRC चा तो पहिलाच फेलो. आज या गोष्टीला ७ वर्ष होऊन गेली.त्या नंतर काही वर्षांतच जगन्नाथ च नाव अल्झायमर्स  क्षेत्रांत खूप प्रसिद्ध झाले होते आणि  काय हा दैव दुर्विलास म्हणावा की आज तोच जगन्नाथ अल्झायमर्स सारख्या रोगाशी स्वतःच्या जीवनासाठी लढत होता.

इंगेला मृण्मयी आणि सौम्य ची आठवण झाली. दोघेही काल रात्रीपासूनच हॉस्पिटलच्या रिसेपशन मद्ये बसून होते . अवघ्या बारावर्षाचा सौम्य बावरलेला होता .

आज २६ नोव्हेम्बर २०१९, मार्गशीर्ष अमावास्या ,रात्रीचे ११:४५ PM , उद्या  पौष प्रतिपदा , २७ नोव्हेंबर 20१९ जगन्नाथाचा ४६ वा वाढदिवस .मृण्मयी हॉस्पिटल रिसेपशन च्या सोफ्यावर बसून विचार करत बसली होती .सौम्य तिच्या खांद्यावर डोके ठेवून काही वेळेपूर्वीच झोपला होता .

गेले जवळ जवळ सहा महिने जगन्नाथ CADRC हॉस्पिटल च्या बेड वर होता .सुरुवातीला तल्लख बुद्धीचा जगन्नाथ छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागला होता . मृण्मयीला वाटले कामाच्या व्यापात विसरत असेल .मग हळू हळू हा विसराळू पणा वाढत गेला . त्याची जागा कधी गोंधळाने  घेतली हे लक्षातच आले नाही .

त्या दिवशी जगन्नाथचा ५ PM फोने आला तिला . तो सौम्याच्या शाळेतून कॉल करत होता.

 "हॅलो मृण, दिझ  गाईस आर सेयिंग दॅट सौम्यास कलचरल प्रोग्रॅम वास लास्ट इयर ! डिडन्ट यु रिमाईंड मी येस्टरडे टु कॅम डिरेक्टली फ्रॉम वर्क टुडे?"

दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दोघे इंगे कडे दवाखान्यात गेले होते.संध्याकाळी प्रथम चाचणी रिपोर्ट्स आले होते . जगन्नाथ मद्ये अल्झायमर्स ची सर्व लक्षण होती.

सर्व साधारण पणे फर्स्ट स्टेज ते सिक्सथ स्टेज यायला ४ ते ६ वर्ष सहज निघून जातात. पण जगन्नाथ च्या अल्झायमर्स ने मात्र  हा टप्पा डिड वर्षांतच पार केला होता . जगन्नाथच सर्वच त्याच्या सारखे फास्ट होत .सहा महिन्या पूर्वी जगन्नाथ ला खाण्या पिण्यास त्रास होऊ लागला . इंगेनी त्याला घरून हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करवले. ती त्याची जातीने काळजी घेत होती. गेल्या १० वर्षांत सुखठणकर कुटुंबाला तिचा खुपच आधार होता. अगदी राहायचे घर शोधण्या पासून ते सौम्य च्या स्कूल ऍडमिशन पर्यंत सर्व गोष्टीत. मृण्मयीला तर ती मोठी नणंद च नव्हे तर प्रेमळ सासु सारखिच वाटत होती. जणू काही शांतादुर्गाच इथे अमेरिकेत इंगेच्या रूपाने त्यांची काळजी घेत होती. जगन्नाथ इथे अमेरिकेत जरी स्थयिक झाला असला तरी त्याने मोठ्या पंचमी ची (कवळे - गोवा) शांतादुर्गेची रथयात्रा कधीच चुकवली नव्हती व ह्या आजारांत ही चुकवली नाही. अगदी गेल्या वर्षी ही ते सर्व दर्शनास गेले होते. इंगेही होतीच त्यांच्या बरोबर. गेली सात वर्ष न चुकता तीही त्यांच्या बोरोबर येत होती. जर्मन संस्कृतीत जन्मलेली आणि अमेरिकन संस्कृतीत मोठी झालेली इ॑गे गेल्या दहा वर्षांत सुखठणकरांच्या मराठ मोळया भारतीय संस्कृतीत अगदी सहजपणे सामावुन गेली होती. दिवाळ सण, भाऊ बीज , पाडवा नव -वर्ष , गणपती असे सर्व सण इंगेने त्यांच्या बरोबर मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरे केले होते .कोणाचे ऋणानुबंध कसे असतात हा तो परमेश्वरच जाणो ! मृण्मयी च्या डोळ्या पुढुन हा काळ सरकत होता. ती डोळे बंद करून सोफ्यावर टेकली होती. शेजारी सौम्य तिला बिलगून शांत झोपला होता .

आय.सी.यु त एक अलिप्त शांतता होती . जगन्नाथ व्हेंटीलेटरव्हर होता .अधून मधून पाहायला  येणारी नर्स व आजूबाजूला असणाऱ्या इंस्ट्रुमेंट्स चाच काय तो आवाज . बाकी सर्व शांत व थंडगार. इंगेचा मात्र गेले १८ तास डोळ्याला डोळा लागला नव्हता. ती केबिनच्या काचेतून एक टक जगन्नाथ कडे लक्ष्य ठेवून होती. तिचे डोळे भरून आले होते पण ती अश्रू येऊ देत नव्हती. गेली सहा महिने तिने आपले मन घट्ट करून अश्रू दाबले होते, फक्त मृण्मयी खचुन जाऊ नये म्हणून! ती मृण ला (जगन मृण्मयीला लाडाने मृण म्हणत असे) सतत धीर देत होती आपले दुःख बाजूला सारून. जगन मध्ये तिने आलबेर्ट लाच पहिले होते. आलबेर्ट तिचा धाकला भाऊ, हॅन्डसम, कुरळ्या केसांचा, उंचपुरा आणि बांधेसूद. एरफोर्स पायलट च्या पोशाखात तो किती रुबाबदार आणि उमदा दिसत असे. आलबेर्ट ला वेगाचे वेड होते. म्हणून तर तो एरफोर्स मध्ये जॉईन झाला होता. तो नेहमी वेगाशी पैजा मारायचा! एक दिवस हरला… जगन सुद्धा वेगवान, पण डोक्याने. त्याच्या विचारांची झेप आणि वेग असा काही होता की भल्याभल्यांची बोटे तोंडात जावी.

पण गेल्या दोन वर्षांत काय झाले, कुणाची नजर लागली जगन ला? त्याची ती झेप आणि वेग दोन्ही अल्झायमर्स ने खंडित केले. गेल्या सहा महिन्यात तर जगन चे हाल तिला बघवत नव्हते. स्वतःच्याच मल मुत्रांत तॊ खितपत पडला होता. मृत्यूच्या प्रतीक्षेत, तो मात्र काही केल्या येत नव्हता. आजून किती परीक्षा पाहणार होता तो त्याची! जगन च्या डोळ्यांत तिने ती आर्तता , तो आक्रोश , ती असाह्यता , ती व्याकुळता किती तरी वेळा पहिली होती . त्याचे डोळे मृत्यूला आळवत होते पण मृत्यू काही प्रसन्न होत नव्हता. इंगेनी मनातल्या मनात त्या शांतादुर्गेला विचारले, “आई अजून किती दिवस तु त्याला असे क्षणा क्षणाने मारणार आहेस? तुला तुझ्या मुलाची दया येत नाही काय? सोडव त्याला या जीवन नसलेल्या जीवनातून लवकर! त्याला मुक्त कर आई त्याला मुक्त कर”. इंगेच्या डोळ्यातून एक अश्रू कधी ओघळला तिचे तिलाच कळले नाही. तिने स्वताःला सावरले व एका निशाचयाने चैरवरून उठली.घड्याळांत सकाळचे ६:०० AM झाले होते . अरे आज २७ नोव्हेंबर 20१९, जगन चा ४६ वा वाढदिवस . दार वर्षी प्रमाणे ती या वर्षी पण त्याला गिफ्ट देणार होती.

जगन्नाथ शांत झोपला होता. वेळ आणि काळ याचे आता त्याला काहीच देणे घेणे नव्हते. फक्त आपण असल्याची जाणीव काय ती उरली होती. सर्वत्र शांतता व उबदार थंडपणा, घट्ट काळोख आणि कसला तरी आवाज इतकेच उमजत  होते …..,  असावे कदाचित. इतक्यात त्या काळोखांतून दुरून एक प्रकाशचा ठिपका जवळ येत असलेला त्याला जाणवला. हळू हळू तो शुभ्र सफेद प्रकाश मोठा होत चालला होता. समोर त्या सुंदर अगम्य प्रकाशांत प्रत्यक्ष शांतादुर्गा त्याला भेटायला आलेली होती. त्याच्या शरीरावर रोमांच उठले , अष्टभाव दाटून आले , डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असल्याची जाणीव त्याला झाली .अचानक शांतादुर्गेच्या जागी इंगे समोर उभी दिसली , तेच शांतादुर्गेचे विलोभनीय स्मित आणि मायेने व करुणेने भरलेले डोळे, पण ही तर इंगे! "इंगे शांतादुर्गा  केव्हा नी कशी झाली अशी ?" त्याचे मन स्वतःलाच विचारत होते. सत्य काय आणि भ्रम काय हे त्याला कळत नव्हते. त्याने वाकून इंगेला नमस्कार केला. त्याच्या शरीरांतून त्याला एक ज्योत निघताना दिसली ती शांतादुर्गेत विलीन होत गेली. आता सर्व हलकं हलकं वाटत होत. एका कैदेतुन मुक्त झाल्या सारखे वाटत होते. तो उडत होता. सहज त्याची नजर खाली गेली. खाली  एक सुंदर हिम प्रदेश पसरलेला होता , त्यात एक छोटं झोपडीवजा घर होत . सूर्य नारायण नुकताच उगवत होता. जगन ने त्या तेजाला नमस्कार केला.

इंगे ने सलाइन मधली सिरिंज काढून  तिच्या पर्से मध्ये ठेवली . तिचा जगन मुक्त झाला होता. प्रतिपदेचा सौम्य सूर्य नारायण नुकताच उगवत होता. आता तिला अजून कणखर बनायचे होते, मृण साठी आणि सौम्य साठी . बरीच कामे पडली होती . सौम्य ला खूप खुप मोठा कारचा होता . जगन पेक्षा ही खूप मोठा .

 

अजय सरदेसाई (मेघ)

१८/५/२०२१ ७:२८ PM

Saturday 15 May 2021

दोन घटना


१. दूर कुठेततरी हिमालयाच्या पायथ्याशी जंगलांत वसलेला एक छोटेसे आदिवासी गाव . गाव तुरळक वस्तीचे . घनदाट जंगलाने , दर्या खोऱ्यानी  घेरलेले .शहरा पासून , लोक वस्ती पासून तुटलेलं. जंगली श्वापदांची  शिकार आणि  फळे खाऊन निर्वाह चालत असे . जोगिया त्यांचा मुखिया आणि चंपा त्याची बायको . त्यांच्या बरोबर जोगियाची वृद्ध आजी .

आज वस्तीचा शिकारीचा दिवस असल्याने जोगिया आपल्या लोकांना घेऊन तिन्ही सांजेलाच शिकारी साठी बाहेर पडला होता. चांगली मोठी शिकार मिळाल्यास उद्या मोठं गाव जेवण होणार होतं. मार्गशीर्ष  महिन्याची कडाक्याची थंडी . दिवस अमावास्येचा . बाहेर कुट्ट काळोख . मध्य रात्र उलटून गेली तरी जोगिया चा पत्ता नव्हता .आजी थोडी काळजीतच होती ,चंपाचे दिवस भरत आले होते व केव्हाही बाळंत झाली असती . रात्री पासूनच चंपाच्या पोटात कळा सुरु झाल्या . अमावस्या होतीच त्या मुळे बाहेर मिट्ट काळोख पण त्यात भर म्हणून कि काय अचानक वीज़ेच्या कडकडाटासकट घनघोर पाऊस पडायला लागला .त्यात झोम्बरे वारे आणि कडाक्याची थंडी . वारा सु सु करत झोपडीत घुसण्याचा  प्रयत्न करत होता. चंपा अडली होती . वृद्ध आजी तिला धीर देत होती . या थंडीत सुद्धा चंपाच्या मुखावर धर्म बिंदू ओघळत होते .आजी मनातून घाबरलेली होती . तिचा जीव वर खाली होत होता . अश्या ह्या परिस्तितीत मदतीला  कोणीच येऊ शकत नहव्ते .चंपा असहाय वेदनेने तळमळत होती . सुटकेच्या प्रतीक्षेत. प्राण कंठाशी आले होते . रात्र उलटून केहवचं ब्रम्ह मुहूर्त आला होता . चंपा  सुटकेसाठी तळमळत होती पण सुटका होत नव्हती .रात्र वैऱ्याची होती . तिचा धनी तिच्या सोबत नव्हता .क्षणा क्षणा ला वेदना असह्य होत होत्या . आजीने घरातल्या देवाला दिवा पेटवून साकडे घातले . फडफडत्या ज्योतीच्या प्रकाशात चंपा लढत होती . वेळ सरत होती . युद्ध संपत नव्हते . चंपेला ग्लानी येऊ लागली . ती थकली होती लढून. तिने हार मानली व स्वतःला मृत्यूच्या हवाली करण्यास तयार झाली. डोळे मिटताना फक्त एकच दुःख मनात होते . तिचं बछडं कसं असेल , मुलगा का मुलगी , वाचेल कि तिच्या बरोबरच मृत्यूच्या दाढेत जाईल हे तिला कळणार नव्हते . परमेश्वरा का रे असे करतोस ? या विचारताच तिने डोळे मिटले , तिला मृच्छा आली .प्राण जाऊ पाहत होते . इतक्यात आजी ने केविलवाण्या रडण्याचा आवाज ऐकला. आजीचे डोळे चकाकले . जोगियाचा वंश पुढे नेणारा जन्माला आला होता .रात्र केव्हांच उलटली होती , पाऊस संपला  केव्हांच होता , वारा शांत वाहत होता . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . पक्ष्यांचा किलबिलाटात झोपडी बाहेर शिकारीहून परतलेल्या लोकांचा विजयी जल्लोष  ऐकू येत  होता . आज बऱ्याच दिवसांनी वस्तीत मेजवानी होणार होती .

 

हिमालयाचा अती दुर्घम  उंच परिसर .ढगांच्या हि वर  उंचच उंच बर्फाळ शिखरांनी वेढलेला .खाली दूर खोल दर्या पसरलेल्या . जंगली श्वापदांनाही दुर्घट असणारा मग मनुष्य प्राण्याची ते थे काय गाथा . मनुष्य प्राण्यां पासून निसंपर्क असा तो प्रदेश पण अतिशय अलौकिक निसर्ग सौंदर्याने नटलेला .

संध्या कधीच उलटून गेलेली रात्रीचा प्रहार केव्हाच सुरु झालेला . माधव ने गुफे बाहेर आंत धुनी पेटवली . थंडी खूपच बोचरी कडाक्याची होती . आज जरा जास्तच . ह्या दिवसांत अशी थंडी असतेच अर्थातच माधवला त्यांत काही नवीन नव्हते . मार्गशीर्ष महिना आणि त्यात अमावास्या . थंडी नाही तर काय असणार ? गेली बारा  वर्ष त्याच्या सोबतीला हा निसर्ग रम्य  मनुष्य  निसंपर्क परिसर , दिवस ,रात्र आणि थंडी इतकेच होते . गुरुदेवांबरोबर इथे येऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होणार होती .गुरुदेवांना भेटून हि तितकीच वर्षे लोटली होती . तो उत्साहात होता कारण गुरुदेवांचा मानसिक संदेश त्याला मिळाला होता की उद्या ते त्याला भेटायला येहार आहेत .बारा वर्ष तो गुरुदेवांच्या आज्ञे चे काटेकोर पालन करीत  निःसंग , निसंपर्क आयुष्य व्यतीत करीत होता . शरीर , मन आणि तो या शिवाय आणि कोणीच नव्हते इथे . सर्वत्र शांतता आणि स्तब्धता . हळू हळू शरीर आपले ओझे विसरून गेले  मनाच्या सर्व व्याधी गळून पडल्या . मन निरिच्छ कधी  झाले हे त्याचे त्याला ही कळले नाही . मन , शरीर आणि तो एकच झाले होते आणि तो या निसर्गाशी एक रूप झाला होता . अंतर बाह्य द्वैत उरले नव्हते . उरली होती ती फक्त जाणीव असण्याची .

तरीही आज काही तरी वेगळेच होते . गुरुदेवांच्या येणाच्या संदेशाने काही तरी वेगळाच उत्साह उर्मी आले होती . त्यामुळे माधव ला निद्रा येत नव्हती . तो मुर्ग जिनावर धुनी शेजारी पद्मासनात बसला होता . डोळे मिटलेले होते . मन शांत होतं तरीही त्या शांत मनावर हलकेच आनंद तरंग उठत असलेले तो पाहत होता .ब्रह्म मुहूर्त जवळ येत होता इतक्यात दूर खाली दरीत कुठेतरी विजा कडाडल्याचा आवाज घुमला . माधव चे डोळे आपोआप उघडले व आवाजाच्या दिशेने पाहू लागले . दूर खाली ढगांतून विजेचा प्रकाश प्रथम दिसला व नंतर आसमंतात व श्रोतांत आवाज घूमला . दृश्य अजब होते . खाली दारींत वादळ  वाऱ्या सकट पाऊस आणि इथे ढगांच्या हि वरती असलेली ही जागा . इतक्या वरतून आणखीनही  वरती दिसणारं अमावस्येचे चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश 

खाली त्या खोल दरीत  निसर्ग आक्रोश करत होता आणि इथे वरती निरव शांतता जाणवत होती . दोन वेगळी विश्व इथून एकाच वेळी दिसत होती आणि माधव स्तीतप्रज्ञा प्रमाणे फक्त पाहत होता . वेळ सरत होती . दृश्य सरकत होते , पालटत होते . माधव चे डोळे फक्त ते दृश्य पाहत होते  , मन मात्र निर्विकार . इतक्यातच गुरुदेवांचा संदेश मनांत अलगद विसावला. माधवा अरे तयार आहेस ना ? हा बघ मी आता पोहचणारच आहे . 

माधव भानावर आला . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . त्याच क्षणी माधवच्या नजरेत शुभ्र बर्फातून वर सरकत येणार एक छोटा ठिपका भरला. तेच गुरुदेव होते . बारा वर्षांचा काळ सरकला होता . माधव ला आपले डोळे ओले झाल्याचे जाणवले . तो चपापला . आनंद अश्रूंचा बांध फुटला होता .

 

 

अजय सरदेसाईमेघ )


Wednesday 5 May 2021

कुछ कहना हे खुदा से

आज कल किसी भी बात से मैं हैरान नहीं I

ऐ खुदा तेरी इस जि॑दगी से कौन परेशान नहीं I

केहने को तु खुदा है पर तेरी फितरत पर मुझे शक है I

क्यों किसी मासुम को भी इस गुरबत से कोई छुटकारा नहीं I

-*-*-*-*-

माना के तेरे रेहमोकरम पर जिते है हम सभी I

इस तरह उसे जताने का यह सबब तो नाही I

तेरे खुदा होने का तारुख भी हमसे ही तो है I

तुम होकर भी न रहोगे खुदा अगर इस दुनिया में हम नहीं I

हर शक्स को यह हक है के हम पुकारे तुझे I

मगर भुले तो याद दिलाने का यह सबब ठिक नहीं I

-*-*-*-*-

सितम तुम्हारे खुशीसे सहलु I

न फरियाद कोई करु , अपने लब सिलु I

लेकिन ऐ खुदा यह तो बता के आखिर माजरा क्या है?

जुस्तजु तेरी हर बशर को है I

तु रुबरु है मगर बसर में नहीं I

तेरे होने किआहट दिल सुनता तो है I

तु असर में भी है मगर नजर में नहीं I

ऐ खुदा यह तो बता के आखिर ये माजरा क्या है?



मेघ

५/५/२१ ३:०० PM