प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday 24 May 2021

स्वप्नांचा व्यापारी

 


        मी  एक  व्यापारी स्वप्नांचा

स्वप्न विकणे हे माझे काम I

छोटी मोठी ,सुंदर अवखळ

विकतो घेऊनि त्यांचे दाम II

 

दुकानांत माझ्या स्वप्नांच्या राशी                       

नीट मांडल्या आहेत कपाटी I

या पहा नी घेऊन जा 

स्वप्न ,जे  आवडे  तुमच्या  मानसी II

 

स्वप्नांची माझ्या न मोठी किंमत

आहे की नाही ही गंमत जंमत I

या या लवकर सारे या 

स्वस्त स्वप्ने खरीदून न्या II

 

पण जरा थांबा , सावधान !

बाहेर लावलेला तक्ता वाचा I

विकलेली स्वप्नं आम्ही घेत नाही परत 

घेताना तुमची अक्कल कुठे होती चरत II

 

अजय सरदेसाई  ( मेघ ) 

२४/५/२०२१ - ४:३३ PM

No comments:

Post a Comment