प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 31 August 2013

डोळे


मी अबोल आहेअसे तू नेहमी म्हणतेसपण...  बोलताना तुझ सवे शब्दच अपुरे पडतात.

मग मी बोलत नाहीफक्त  तुला पाहतो .बोलत असतात ते फक्त मझे डोळे.

पण तुझे त्यांच्याकडे लक्षच कुठे असतेतुझया शब्द जंजाळातून तुला वेळ मिळाला तर पहशील!

अग वेडे  , प्रेमाला शब्दांची गरजच नसते.डोळेही बोलून जातात कधी शब्दांच्याही पालीकडलेपण तू ऐकशील ,तर खरी !

अग प्रेमात गरज असते ती फक्त डोळ्यांचीचडोळसपणे एकमेकांना ओळखण्या साठी, पराखण्या साठी ....,.

अगप्रिय व्यक्तीची अविरत वाट पाहतात ते डोळेच आणि विरहाने ओले होतात ते ही डोळेच.

सुखाने न्हाहून जातात तेही डोळेचईतकेच कायप्रेमिकांची पहिली भेट घालून देतात तेही डोळेच ना!

म्हणूनच सांगतो प्रिये , फक्त डोळ्यांनीच बोलशब्दांमागे लागू नकोस , शब्द खोटेही असतात !

 

फक्त डोळे खरे बोलतात , फक्त डोळेच खरे बोलतात .

 

 

अजय सरदेसाई (मेघ)

 

27/08/1994                                                           7.30 PM



 
 



 

No comments:

Post a Comment