प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 31 August 2013

स्पंदन : माझी पहिली कविता


ही माझी पहिली कविता , 25 वर्ष झाली आता , PVPIT च्या स्पंदन नावाच्या कॉलेज बोर्ड magazine मधे लावली होती. मी माझे नाव न देता " मेघ " या टोपण नावाने दिली होती . सुनील म्हडकर नावाचा एक आमचा मित्र होता , त्याने नेऊन दिली होती . आता या जगात नाही तो , वल्ली होता एक.
 
 

तू निशब्द होतेस तेव्हा , तू भरभरून  बोलतेस तेव्हा ,
तू हसतेस खळखळून तेव्हा , तू गंभीर होऊन चेहरा ओलवतेस तेव्हा ,
आणि ..................
प्रत्येक त्या वेळी जेव्हा तू बरोबर असतेस ,
मी फक्त तुझे सभवताली असणे अनुभवत असतो , बाकी मला काहीच कळत नाही .
तू माझी आणि मी तुझाच फक्त उरतो
प्रत्येक क्षण  स्पंदानात  मिसळतो.

अजय सरदेसाई (मेघ)
07/01/1989        6.25 PM



No comments:

Post a Comment