प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 31 August 2013

जीवनात माझा येशील का ?






स्वप्नांत माझा येतेस जशी

जीवनात माझा येशील का?

वेड्या माझा मनात प्रीतीच्या

रेशीम गाठी विण्शील का?

जीवनात माझा येशील का?

 

श्रावनच्या रिम झिम सरी

बरसती  जश्या धरेवरी,

बेधुन्द तशी होऊनि मज वर

प्रीती प्रिये तू करशील का?

जीवनात माझा येशील का?

 

स्वप्नातल्या नील परी

मूर्त होऊनि या वसुंधरी

प्राजक्त होऊनि प्रीतीचा

अंगणी माझा बरसशील का?

जीवनात माझा येशील का?



अजय सरदेसाई (मेघ)
12/09/1994                                                         7:30 PM

No comments:

Post a Comment