प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday 23 January 2024

मी कुठे जात आहे


तो सुर्य पहा नभात आणि प्रतिबिंब डोहांत आहे

कोण सत्य कोण मिथ्य हा एकची प्रश्न आहे ।।


अरे वेड्या मनारे हा काय प्रश्न झाला।

जो जास्त ताप देतो तोची सत्य आहे ।।


भ्रम सहज होतो नलगे रे सायास फार

सत्य कटू  फार कठिण पचण्यास आहे।।


चांदण्या चमकती हळुवार भोभाटा नाही फार

पण गर्भात रे त्यांच्या नव विश्व निर्मीती आहे।।


हा सुर्य दिसे तेजस्वी,ओजस जोवर डोळ्यांत

मिटताच डोळे जाणो, मी कुठे जात आहे ।।

 

मंगळवार, २३//२०२४ , :१५ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment