अनंत तारे, नेमका माझा कोणता,आकाशात?
का त्याला उगवायचे आहे अजुन, आकाशात?
हा त्याचा, तो ह्याचा,कळते ना,पाहुन आकाशात
ती रात्र येईल कधी, हा माझा, मी म्हणेन,पाहुन आकाशात?
कधी कधी आकाश पाण्यात अलवार उतरते,
अमर्याद नसते, मी उतरतो शोधत तारा त्या आकाशात!
एकदा ती मला पाहुन लाजत हसली,चांदणी,
तेव्हा कळलं,तारे नव्हते माझे,चांदणी होती, आकाशात.
"मेघ" म्हणतो, तारा शोधणे संपले आता,
एक हसरी चांदणीच माझे विश्व झाली, आकाशात.
शुक्रवार, १७/७/२६ , ४:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment