प्रित फुलांचे ,हे पाश
चांदण्यांचे,
गुंफले अलवार अंतरी,मायाजाळ स्वप्नांचे.
तु जवळ नसता,कावरा होतो जीव,
नी तू जवळ असता,गडबडते गणित श्वासांचे.
कल्लोळ भावनांचा मन गोंधळून गेला,
न कळे मग मला,करु काय त्या क्षणांचे.
हे कूंद भाव विश्व सजवले कुणी मनात,
वाटे तिथेच रहावे,हरपुन भान जगाचे.
पायवाट चांदण्यांची ,तरी जपुन ठेव पाय,
पुढे असेल निश्चित रान, निर्बिड आसवांचे.
ना ऐकले मनारे,वेड्या का लावलास जिव,
उरले हाती फक्त बोचरे काटे आठवांचे.
सोमवार, ४/७/२५ , ६:५८ PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment