प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday, 17 August 2025

कधीतरी‌ ते संपणार आहे.


गेलेले क्षण का परतणार आहेत!

सांगुन का तुला हे कळणार आहे?

क्षण गेलेले सुंदर,आठवांतच फुलणार आहेत,

त्यांच्याच सोबतीने जीवनाचा प्रवास खुलणार आहे.

उमलले ले फुल किती जगणार आहे?

सुगंध उधळुन ते कोमेजणार आहे.

स्वप्न किती काळ टिकणार आहे?

उघडताच डोळे, स्वप्न ते विरणार आहे.

कितीही जपले तरी ते निसटणार आहे,

हेच जिवन आहे,कधीतरी‌ ते संपणार आहे.

 

शुक्रवार, १५/८/२५, ६:४७ PM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment