बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात,
ठेविलेस का तू जपून अजून क्षण ते मनात?
तो राजहंस मुग्ध जलतरे डौलात,
तुझेच प्रतिबिंब दिसे मला त्या तळ्यात.
नभातून पडले मोती हिरव्या पानांत,
हार मोत्यांचा तो, तुझ्या शोभला गळ्यात.
रातराणीच्या तारकांनी झाली डाटी निळ्या नभात,
सुगंध तुझा अवचित मिसळला त्या फुलांत.
लखलखती चमचमती ही रात्र भेटीची,
कळले ना संपली कशी,जणु काही क्षणांत.
शुक्रवार १५/८/२५ ,१:३० PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment