चंद्राचे चांदणे गुंफले हळव्या क्षणात,
प्रीत तुझी सखे उतरली माझ्या मनात.
डोळ्यांत तुझ्या बोलकी स्वप्नं उमटली,
हृदयांत माझ्या प्रतिबिंब त्यांची उमटली.
मंद वाऱ्यावर गंध तुझा अलवार पसरला,
मन कुंद झाले,तो हृदयात माझ्या साठला.
या शुष्क जीवनात तू प्रेमचा ओलावा भरला,
मम अस्तित्वास अचानक मृदु अर्थ लाभला.
सांजवेळी गुणगुणतो मी तुझी गाणी मनात,
रातराणीचा सुगंधी दरवळ पसरला,या मुग्ध क्षणांत.
रविवार, ३/८/२५, १०:१७ PM
अजय सरदेसाई — मेघ
No comments:
Post a Comment