बगळ्यांची माळ फुले अजुनी
अंबरात,
गीत तुझे गोतो मी अलवार माझ्या मनात.
झाला नजरेआड रवी मावळतीचे रंग उधळुनी,
उतरला गंध तुझ्या आठवांचा अलवार माझ्या मनात.
सांजवेळी त्या क्षणी,जणू पसरली मखमल खमात,
मखमल ती पांघरुनी,उठले रोमांच अंतरात.
नभाकाठीं सोनपावलें, दिवस गेला संथ शांत ,
निशाकराच्या मिठीत,कुजबुजली रात्र
अंगणात.
मंद चांदणे शिंपीत आला पौर्णिमेचा चंद्र,
मनमोर फुलला हळूवार
माझ्या तनात.
गुरुवार,१४/८/२५ ,१२:२३ AM
अजय सरदेसाई -मेघ
अलवार = अलगद
खमात = आकाशांत
नभाकाठीं = क्षितिजावर
निशाकर = चंद्र
No comments:
Post a Comment