प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday 5 April 2024

सुंदर माझे स्वप्न


 

निजलो असता, माझे स्वप्न न जाणे कुठे हरवले,

निजेतून येताच जाग, कोठे ची ते मज सापडले .

 

किती सुंदर होते स्वप्न जे मी उराशी बाळगले,

कोणी शोधून द्याल का ,माझे स्वप्न जे हरवले.

 

रात्रीच काल पाहीले होते मी त्यास झोपे आडून ,

झोपताच गाड मी नेले त्यास कोणी चोरून?

 

रंगबिरंगी होते ते,त्यास उडण्यास पंख होते,

ते उडत,बागडत तर नाही ना गेले कोठे?

 

विसरले तर नाही ना ते,कोठे आपले घर होते?

कुणी शोथुन द्या हो ,जे सुंदर माझे स्वप्न होते.

 

शुक्रवार, ०५/०४/२०२४ ०१:०९ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment