प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 14 August 2024

तू भेटशी नव्याने


एकांती मन माझे , स्मरते तुझ्या आठवांना

प्रत्येक आठवांत त्या, तू भेटशी नव्याने

त्या उंच आसमंती, मन झेप घेई माझे

जणू उंच भरारी घ्यावी, पक्षांच्या थव्याने

क्षण एकच फक्त, डोळ्यांत तुझ्या गुंतलो

का मन मोहरून गेले,जणू सुगंधी मोगरीने

काहूर मनांत उठले,जणू वाहे बेभान वारा

अवचित बरसावे जसे,श्रावणातल्या सरीने

करू काय ते कळेना,मन काही केल्या वळेना

झेपावे जणू पुन्हा पुन्हा त्या ज्योतीवरी पतंगाने

 

गुरुवार   १५/०८/२०२४    १२:०० PM

अजय सरदेसाई (मेघ)


 

No comments:

Post a Comment