प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 16 August 2025

आनंद सोहळा


आनंद सोहळा

"""""""""""""""""

गोकुळातुन गायी चरण्या आला गोवर्धनी कान्हा,
बनसीच्या सुरात रमली सृष्टी,गायींना फुटला पान्हा.

बनसी चा संवाद ऐकुन आल्या गोपीका वेड्या,
बघता बघता घातला त्यांनी चिमुकल्या कान्ह्यास वेढा.

रंगली रास लिला भुवनी, प्रत्येक गोपीके सव एक कान्हा,
त्रिभुवन जमले पहावया जी जादु करीतो कान्हा.

भक्ती रसात भिजुन चिंब गोपीकांनी धरला कान्ह्या भवती फेरा,
प्रसन्न चित्ते हासुन पाहे कान्हा हा सोहळा.

देवांस ही दुर्लभ ऐसा हा अनुपम रास सोहळा,
डोळ्यांचे फिटले पारणे,पाहुनी हा आनंद सोहळा्


शुक्रवार,१५/८/२५, १२:०५ PM

अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment