ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने
आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा
प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची
प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला
पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.
अंत्यविधी होऊन एक
आठवडा
झाला
होता.ती
त्याच्या
अलमारीत
त्याने
जपून
ठेवलेली
कागदपत्रे
आणि
फाईल्स
शोधत
होती,
तेव्हा
तिने
एक
गुप्त
कप्पा
पाहिला.तिचे
हात
तो
गुप्त
कप्पा
उघडताना
थरथरत
होते.तिला
आपल्या
पती
बद्दल कोणतही
असे
गुपित
उघड
व्हावं
असे
वाटत
नव्हते,
ज्यामुळे
तिच्या
मनांतल्या
आपल्या
पतीच्या
सुंदर
प्रतिमेला
धक्का
बसेल
आणि
त्याची
विश्वासहर्ता
तो
मेल्यानंतर
गमावून
बसेल.
तरी पण तिने तो कप्पा उघडला. काहीतरी हलका आणि
कागदी स्पर्श तिला जाणवला, आणि हळूहळू,काळजी
पूर्वक तिने एक नाही, दोन नाही, तर बारा पतंग बाहेर काढल्या. त्या अगदी नव्या
कोऱ्या होत्या, जणू काही नुकत्याच पतंगाच्या दुकानातून आणल्या होत्या, आणि त्या पतंगांना
बघून ती रडू लागली.
"एक
दिवस,"
त्याने
तिला
सांगितले
होते,
"माझ्याकडे
वेळ
असेल
तेव्हा
मी
छतावर
पतंग
उडवेन!"
"तू
आधी
पतंग
उडवल्या
आहेत
का?"
तिने
विचारले
होते.
"मी
लहान
असताना
मला
पतंग
खूप
आवडायच्या,"
त्याने
सांगितले
होते,
"आकाशात
पतंग
उंच
उडताना
आणि
राजा
सारखी आकाशावर हुकूमत गाजवताना पाहणे
मला
खूप
आवडायचे!"
"मग
याच
रविवारी
का
उडवत नाही?" तिने
विचारले
होते.
"ओव्हरटाइम
आहे!"
त्याने
सांगितले,
"पण
कदाचित
पुढच्या
रविवारी
किंवा
त्यानंतर
येणाऱ्या
सुट्टीला,
बघू , पाहू कसं जमतंय ते!" तो
म्हणाला.
ती त्या
कागदांना
स्पर्श
करत
रडली.
त्या
मृत
व्यक्तीच्या
स्वप्नांचा
विचार
करत
रडली,
जो
कधीच
साध्या
पतंग
उडविण्याच्या
आनंदाला
ही
मुकला होता.
दुसऱ्या
दिवशी
तिची
मुलं
घरी
आली.
त्यांनी
पतंग
दिवाणखान्याच्या
भिंतीवर
लटकलेल्या पाहिल्या.
"आई,"
त्यांनी
विरोध
केला,
"आता
उत्सव
साजरा
करण्याचा
काळ
नाही,
हा
शोक
करण्याचा
काळ
आहे!"
"होय,"
तिने
म्हटले,
"मला
माहित
आहे,
आणि
म्हणूनच
मी
त्या
येथे
ठेवल्या
आहेत!"
त्यांनी
त्या
पतंगांना
स्पर्श
केला,
त्यांनी
सुंदर
डिझाईन्स
पाहिल्या,
आणि
त्यांनी
आईकडून
ऐकले
की
तिला
त्या
पतंग
कुठे
सापडल्या
होत्या.
आपल्या मृत
वडिलांचा
आणि
त्यांनी
कधीच
न
उडवलेल्या
पतंगांचा
विचार
करून
त्यांच्या
डोळ्यांत
पाणी
तरळले,.
"आई!
मला
एक
पतंग
माझ्या
घरी
न्यायला
आवडेल!"
मोठा
मुलगा
म्हणाला.
"आणि
मला
एक
माझ्या
घरी
हवी
आहे,"
दुसरा
मुलगा
म्हणाला.
तिने त्यांना
पतंग
दिल्या.तिचं
हृदय
आनंदाने
भरून
आलं,जेव्हा
मुलांनी
पुढच्या
आठवड्यात
तिला
फोन
आला.
"आम्ही
तुला
न्यायला
येत
आहोत,
आई,
आपण
वीकेंडला
कॅम्पिंगला
जात
आहोत!"
"कॅम्पिंग?"
तिने
विचारले,
"मी
कधीच
कॅम्पिंग
केले
नाही!"
"आम्हीही
नाही,
पण
हीच
ती
पतंग
आहे
जी
आम्हाला
उडवायची
आहे,
आई.
चल,
निघूया!"
ती हसली,
जेव्हा
ते
डोंगरदऱ्यांतून
कार
चालवत
होते,
तिने
मागे
आपल्या
दुसऱ्या
मुलाची
कार
पाहिली,
आणि
खिडकी
बाहेर पाहताना,
तिला
असं
वाटलं
की
ती
आपल्या
पतीला
बघत
आहे,
हसत
असलेला,
पतंग
उडवत
असलेला,
आणि
त्या
पतंगाला
उंच
उडताना
पाहत
आहे,
जणू
तो
राजा
आहे.
अलमारीतल्या
त्याच्या
दुःखी
पतंगांनी
त्याच्या
मुलांच्या
पतंगांना
पंख
दिले
आणि
उंचच
उंच
आकाशात
उडवले.
आणि तुमचं
काय,
माझ्या
मित्रांनो
? तुमच्या
पतंगाही
अलमारीत
सापडतील
का,
की
त्या
आकाशात
उडतील?
तुमच्या
स्वप्नांचा
पाठलाग
करा!
जे
तुम्हाला
आवडते
ते
करा
जोपर्यंत
तुम्ही
ते
करू
शकता.
नंतर
फार
उशीर
होईल.
बर्याच
गोष्टी
आहेत
ज्या
तुम्हाला
करायच्या
आहेत
किंवा
सांगायच्या
आहेत,
परंतु
विलंब
त्या
स्वप्नांना
आणि
इच्छांना
विरून
टाकतो,
आणि
त्या
अपूर्ण
स्वप्नांना
इथेच
सोडून
तुम्ही
हे
जग
सोडून
जाता
! तसं
होवो
देऊ
नका
. आपापली
पतंग
बाहेर
काढा
आणि
बेछूट
ह्या
अक्षर
निळ्या
आकाशांत
उडवा
चला पतंग
उडवूया!
🙂🙂🙂🙂🙂🙂😊😊🪁🪁🪁🪁