मुलं मोठी होतच असतात,
पुर्वी शिंग फुटायची, आता मात्र
त्यांना स्वतः ची मतं फुटतात.
पुर्वी सुपर मॅन वाटणारा बाबा,
मुलांना हल्ली बावळट वाटतो.
मित्रमैत्रिणींच्या कूल बाबांसमोर ,
स्वतः चा बाबा अडचण वाटतो .
"तु गप रे बाबा ! , यातलं तुला काय कळत?"
आपल्यांच चिमुकल्यांच्या तोंडुन हे ऐकतांना,
आपलं काळिज मात्र खूप तुटत.
इंस्टाग्राम ,फेसबुक ,यु ट्यूब,
यांचं आपल्याला वावडं असतं.
यातलं काही येत नसेल तर ,
मुलांच्या दुनियेत आपल्याला स्थान नसतं .
मुलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला ,
"बेटा , हे वर्चुअल जग खरं नाही ,"
"ते फक्त एक ईल्यूशन असतं ."
"खरं जग खऱ्या माणसंच असतं"
"ते फक्त ईल्यूशन नसतं बाळा "
"ते फक्त ईल्यूशन नसतं"
पण या वर्चुअल जगांत आपलं कोण ऐकतं
आजच्या मुलांचे आयुष्य हे असाच असतं
मुलं म्हणजे तरी काय?
आपल्याच कर्मांची फळं!
आपण आईवडीलांना जी दिली,
आपण ही सोसायची तीच कळ
आपण ही सोसायची तीच कळ
उद्या
तेही आई बाप होतील
देव
करो नी त्याच्या मुलांना
न
कधी शिंग न मतं फुटतील
गुरुवार २५/०४.२०२४ ०५:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)