प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 31 October 2024

ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी


ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी

भेटींत तृष्टता मोठी  

 

ती एकाकी सांज उमटली क्षितीजा वरती

तुझ्या डोळ्यातींल निळायी पसरली सागर तटी

मनांत कैक विचारांनी केली एकाचं दाटी

तिरकस कटाक्ष टाकत झटकली तू हनुवटी  

 

ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी

 

वाटे वारा होऊन बेभान असेच वाहावे

अंगास तुझ्या मी बिलगून स्पर्शावे

रागास तुझ्या भुर्रकन उडवून न्यावे

तुझ्या डोळ्यांत मी अलवार हरवून जावे

 

ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी

 

डोळ्यांतून पाऊस गेला कधीच बरसून

मेघ ही गरजला तेव्हा,झाले रिते माझे मन

चालतांना मी पुळणीवर,मागे पहिले वळून

जाणे कोणाची पाऊले येत होती मागून

 

ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी


मंगळवार २२/१०/२०२४ ,१०.१७ PM  

अजय सरदेसाई (मेघ)   


 

No comments:

Post a Comment