मी एक व्यापारी स्वप्नांचा
स्वप्न विकणे हे माझे काम I
छोटी मोठी ,सुंदर अवखळ
विकतो घेऊनि त्यांचे दाम II
दुकानांत माझ्या
स्वप्नांच्या राशी
नीट
मांडल्या आहेत कपाटी I
या पहा
नी घेऊन जा
स्वप्न
,जे आवडे तुमच्या मानसी II
स्वप्नांची माझ्या
न मोठी किंमत
आहे की नाही ही गंमत जंमत I
या या लवकर सारे या
स्वस्त स्वप्ने खरीदून न्या II
पण जरा थांबा ,
सावधान !
बाहेर लावलेला तक्ता वाचा I
विकलेली स्वप्नं आम्ही घेत नाही परत
घेताना तुमची अक्कल कुठे होती चरत II
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment