प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 15 May 2021

दोन घटना


१. दूर कुठेततरी हिमालयाच्या पायथ्याशी जंगलांत वसलेला एक छोटेसे आदिवासी गाव . गाव तुरळक वस्तीचे . घनदाट जंगलाने , दर्या खोऱ्यानी  घेरलेले .शहरा पासून , लोक वस्ती पासून तुटलेलं. जंगली श्वापदांची  शिकार आणि  फळे खाऊन निर्वाह चालत असे . जोगिया त्यांचा मुखिया आणि चंपा त्याची बायको . त्यांच्या बरोबर जोगियाची वृद्ध आजी .

आज वस्तीचा शिकारीचा दिवस असल्याने जोगिया आपल्या लोकांना घेऊन तिन्ही सांजेलाच शिकारी साठी बाहेर पडला होता. चांगली मोठी शिकार मिळाल्यास उद्या मोठं गाव जेवण होणार होतं. मार्गशीर्ष  महिन्याची कडाक्याची थंडी . दिवस अमावास्येचा . बाहेर कुट्ट काळोख . मध्य रात्र उलटून गेली तरी जोगिया चा पत्ता नव्हता .आजी थोडी काळजीतच होती ,चंपाचे दिवस भरत आले होते व केव्हाही बाळंत झाली असती . रात्री पासूनच चंपाच्या पोटात कळा सुरु झाल्या . अमावस्या होतीच त्या मुळे बाहेर मिट्ट काळोख पण त्यात भर म्हणून कि काय अचानक वीज़ेच्या कडकडाटासकट घनघोर पाऊस पडायला लागला .त्यात झोम्बरे वारे आणि कडाक्याची थंडी . वारा सु सु करत झोपडीत घुसण्याचा  प्रयत्न करत होता. चंपा अडली होती . वृद्ध आजी तिला धीर देत होती . या थंडीत सुद्धा चंपाच्या मुखावर धर्म बिंदू ओघळत होते .आजी मनातून घाबरलेली होती . तिचा जीव वर खाली होत होता . अश्या ह्या परिस्तितीत मदतीला  कोणीच येऊ शकत नहव्ते .चंपा असहाय वेदनेने तळमळत होती . सुटकेच्या प्रतीक्षेत. प्राण कंठाशी आले होते . रात्र उलटून केहवचं ब्रम्ह मुहूर्त आला होता . चंपा  सुटकेसाठी तळमळत होती पण सुटका होत नव्हती .रात्र वैऱ्याची होती . तिचा धनी तिच्या सोबत नव्हता .क्षणा क्षणा ला वेदना असह्य होत होत्या . आजीने घरातल्या देवाला दिवा पेटवून साकडे घातले . फडफडत्या ज्योतीच्या प्रकाशात चंपा लढत होती . वेळ सरत होती . युद्ध संपत नव्हते . चंपेला ग्लानी येऊ लागली . ती थकली होती लढून. तिने हार मानली व स्वतःला मृत्यूच्या हवाली करण्यास तयार झाली. डोळे मिटताना फक्त एकच दुःख मनात होते . तिचं बछडं कसं असेल , मुलगा का मुलगी , वाचेल कि तिच्या बरोबरच मृत्यूच्या दाढेत जाईल हे तिला कळणार नव्हते . परमेश्वरा का रे असे करतोस ? या विचारताच तिने डोळे मिटले , तिला मृच्छा आली .प्राण जाऊ पाहत होते . इतक्यात आजी ने केविलवाण्या रडण्याचा आवाज ऐकला. आजीचे डोळे चकाकले . जोगियाचा वंश पुढे नेणारा जन्माला आला होता .रात्र केव्हांच उलटली होती , पाऊस संपला  केव्हांच होता , वारा शांत वाहत होता . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . पक्ष्यांचा किलबिलाटात झोपडी बाहेर शिकारीहून परतलेल्या लोकांचा विजयी जल्लोष  ऐकू येत  होता . आज बऱ्याच दिवसांनी वस्तीत मेजवानी होणार होती .

 

हिमालयाचा अती दुर्घम  उंच परिसर .ढगांच्या हि वर  उंचच उंच बर्फाळ शिखरांनी वेढलेला .खाली दूर खोल दर्या पसरलेल्या . जंगली श्वापदांनाही दुर्घट असणारा मग मनुष्य प्राण्याची ते थे काय गाथा . मनुष्य प्राण्यां पासून निसंपर्क असा तो प्रदेश पण अतिशय अलौकिक निसर्ग सौंदर्याने नटलेला .

संध्या कधीच उलटून गेलेली रात्रीचा प्रहार केव्हाच सुरु झालेला . माधव ने गुफे बाहेर आंत धुनी पेटवली . थंडी खूपच बोचरी कडाक्याची होती . आज जरा जास्तच . ह्या दिवसांत अशी थंडी असतेच अर्थातच माधवला त्यांत काही नवीन नव्हते . मार्गशीर्ष महिना आणि त्यात अमावास्या . थंडी नाही तर काय असणार ? गेली बारा  वर्ष त्याच्या सोबतीला हा निसर्ग रम्य  मनुष्य  निसंपर्क परिसर , दिवस ,रात्र आणि थंडी इतकेच होते . गुरुदेवांबरोबर इथे येऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होणार होती .गुरुदेवांना भेटून हि तितकीच वर्षे लोटली होती . तो उत्साहात होता कारण गुरुदेवांचा मानसिक संदेश त्याला मिळाला होता की उद्या ते त्याला भेटायला येहार आहेत .बारा वर्ष तो गुरुदेवांच्या आज्ञे चे काटेकोर पालन करीत  निःसंग , निसंपर्क आयुष्य व्यतीत करीत होता . शरीर , मन आणि तो या शिवाय आणि कोणीच नव्हते इथे . सर्वत्र शांतता आणि स्तब्धता . हळू हळू शरीर आपले ओझे विसरून गेले  मनाच्या सर्व व्याधी गळून पडल्या . मन निरिच्छ कधी  झाले हे त्याचे त्याला ही कळले नाही . मन , शरीर आणि तो एकच झाले होते आणि तो या निसर्गाशी एक रूप झाला होता . अंतर बाह्य द्वैत उरले नव्हते . उरली होती ती फक्त जाणीव असण्याची .

तरीही आज काही तरी वेगळेच होते . गुरुदेवांच्या येणाच्या संदेशाने काही तरी वेगळाच उत्साह उर्मी आले होती . त्यामुळे माधव ला निद्रा येत नव्हती . तो मुर्ग जिनावर धुनी शेजारी पद्मासनात बसला होता . डोळे मिटलेले होते . मन शांत होतं तरीही त्या शांत मनावर हलकेच आनंद तरंग उठत असलेले तो पाहत होता .ब्रह्म मुहूर्त जवळ येत होता इतक्यात दूर खाली दरीत कुठेतरी विजा कडाडल्याचा आवाज घुमला . माधव चे डोळे आपोआप उघडले व आवाजाच्या दिशेने पाहू लागले . दूर खाली ढगांतून विजेचा प्रकाश प्रथम दिसला व नंतर आसमंतात व श्रोतांत आवाज घूमला . दृश्य अजब होते . खाली दारींत वादळ  वाऱ्या सकट पाऊस आणि इथे ढगांच्या हि वरती असलेली ही जागा . इतक्या वरतून आणखीनही  वरती दिसणारं अमावस्येचे चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश 

खाली त्या खोल दरीत  निसर्ग आक्रोश करत होता आणि इथे वरती निरव शांतता जाणवत होती . दोन वेगळी विश्व इथून एकाच वेळी दिसत होती आणि माधव स्तीतप्रज्ञा प्रमाणे फक्त पाहत होता . वेळ सरत होती . दृश्य सरकत होते , पालटत होते . माधव चे डोळे फक्त ते दृश्य पाहत होते  , मन मात्र निर्विकार . इतक्यातच गुरुदेवांचा संदेश मनांत अलगद विसावला. माधवा अरे तयार आहेस ना ? हा बघ मी आता पोहचणारच आहे . 

माधव भानावर आला . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . त्याच क्षणी माधवच्या नजरेत शुभ्र बर्फातून वर सरकत येणार एक छोटा ठिपका भरला. तेच गुरुदेव होते . बारा वर्षांचा काळ सरकला होता . माधव ला आपले डोळे ओले झाल्याचे जाणवले . तो चपापला . आनंद अश्रूंचा बांध फुटला होता .

 

 

अजय सरदेसाईमेघ )


15 comments:

  1. Amazing stories. It links various aspects of life. Story has a sad side yet a light of hope. It compares a spiritual calmness to the hustle and bustle of life.

    ReplyDelete
  2. 😍😍👌👌💯💯

    ReplyDelete
  3. Too good!👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. Amazing👏🏻👏🏻😍😍😍

    ReplyDelete