प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 10 January 2015

माणूस - २


रोज मला शेकडो माणसे भेटतात
माणसे नव्हे त्यांची चित्रेच असतात 
जिवंत असल्याचा फक्त असतो भास 
त्यांची मने मेलेली असतात 

सरळ मार्गी माणूसही थोडासा वक्र असतोच 
जसे सरळ जाणारे मार्ग सुद्धा वक्र असतात 

१/४/१९९५ ,०५:०५ PM 
अजय सरदेसाई ( मेघ )  

No comments:

Post a Comment