प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 11 January 2025

५ लघुत्तम कथा, पण अर्थपूर्ण:-

 

) जर हे त्याचे शरीर आहे , तर ती त्या शरीराचा आत्मा आहे.

) त्यांची आठवण मला येत नाही ! कारण आठवण्यासाठी पहिला त्यांचा विसर पडावा लागतो.

) झाडाला काय माहीत की त्याच्या सावलीत विसावणारा माणूस एक लाकूडतोड्या आहे.

) ते भेटत नाहीत, ते वेगळे ही होत नाहीत.त्यांच अस्तित्व आणि नातं जमीन आणि आकाशा सारखे आहे .जवळीक  खूप आहे, पण नातेसंबंध नाहीत.

) दोघांनी एकमेकांना पाहिले. अनेक वर्षांनंतर ते भेटत होते.दोघांच्याही डोळ्यांत चमक होती, पण एका डोळ्यांत वृद्धत्व आणि थकवा होता, तर दुसऱ्याच्या डोळ्यांत जग जिंकण्याचा आत्मविश्वास.वृद्धाने त्या तरुणाकडे जाण्यासाठी  पाय उचलले, वृद्धाचा तोल गेला,पायाखाली जमीनच लागली नाही.तरुणाने पटकन लपकून उघड्या हातांनी वृद्धाला सांभाळत मिठीत घेतले. दोघेही भावूक झाले होते,डोळ्यांत आनंदाचे अश्रू दाटले होते.

 

शनिवार, ११/०१/२०२५, २०:५२ वाजता.
अजय सरदेसाई (मेघ)
 

No comments:

Post a Comment