Wednesday, 11 February 2026

कुंचला


 


कुंचल्यातून वेदनांचे रंग भरत गेलो मी,
प्रत्येक शब्दातून अंतरीचा हुंदका उमटत गेलो मी।
कागद जरी निःशब्द होते, तरी रेषा बोलत होत्या,
मनातल्या प्रत्येक जखमेचा अर्थ वाचत गेलो मी।
ही तसबीर ओली का दिसते, कुणालाच कळले नाही,
डोळ्यांतून अलगद रंग झरत राहिलो मी।
दाद नाही, दिलासा नाही, कुणी साथ दिली नाही,
स्वतःच्या सावलीतच चालत राहिलो मी।
आठवणींची वादळी झुळूक जेव्हा जेव्हा आली,
स्वप्नांच्या निखार्यांना फुंकर घालत राहिलो मी।
शेवटी उमगलं, ‘मेघ’, हेच कलेचं खरं गूज —
मन जळत राहिलं… आणि त्यातच उजळत गेलो मी।


बुधवार, ११/२/२६ , १०:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment