Saturday, 24 January 2026

कवितेस माझ्या प्राण दे

 



शारदेकवितेस माझ्या प्राण दे,
शब्दांना माझ्या रसवृष्टीचे वरदान दे।

श माझे थेट हृदयास भिडू दे,
शारदेशब्द-शक्तीचे ऐसे दान दे।

भाषेवर प्रभुत्व देशब्दांवर पकड दे,
काव्य लयबद्ध राहोत्यास योग्य छंद दे।

वाणीतून स्वर अनायास वाहू दे,
कंठात मकरंद नित्य राहू दे।

श्रोत्र नि श्रोते तृप्त व्हावेत,
ऐसे दिव्य सुर तू मज वाण दे।

 

शनिवार२४/१/२६ , ४:०५ PM

अजय सरदेसाई -मेघ

 


No comments:

Post a Comment