Monday, 14 July 2025

दुरदेशीचा पक्षी "मी"



दुरदेशीचा पक्षी मी,
दुरुन खूप आलो आहे।
क्षणभर इथे घरटे माझे,
लवकरच प्रस्थान आहे।।


आलो कुठुन इथे लक्षात नाही,
जाणार कुठे,हे अज्ञात आहे।
इथे मर्त्य सर्व वेड्या।
फक्त अस्तित्व अक्षर आहे।।


उन,पाऊस,वारा भोगते ते शरिर।
"मी" कोण? ज्यास न यांचा स्पर्श आहे।।
दुःख,विलास,आनंद अनुभवते ते मन।
तो "मी" कोण जो चिदानंद आहे।।


हा अहंकार मिथ्या,नव्हे सत्य।
तो "मी" कोण जो याचा सर्वसाक्षी आहे।।
अ्नंत रंग त्याचे,एकेक उलगडत आहे।
दृष्टी उलथी ठेऊन,मी त्यास अलवार जाणत आहे।।
 

सोमवार, १४//२०२५ , :४० PM

अजय सरदेसाई - मेघ


No comments:

Post a Comment