Tuesday, 29 April 2025

मना रे

 

तू काय शोधितो रे,
सांग माझ्या मना रे
 
कर विचार तू मना रे,
जरा थांब तू मना रे
 
पाहतोस किती स्वप्ने मना रे,
जगशिल स्वप्नांत किती मना रे
 
अंतरात तू मना परत रे ,
किती रेंगाळशिल बाह्यात रे
 
मी अविनाशी ब्रम्ह मना रे,
का गुंतला तू विनाशी जगात रे
 
पटल मोहाचे तू तोड मना रे,
स्वरुप माझेच मना अटल रे
 
क्षितीजा वर झाली सांज रे,
मना मावळले सर्व रंग रे
 
मना का उद्विग्न तू रे,
मना तू शांत हो रे

 

सोमवार, ११:३५ PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment