Sunday, 20 April 2025

मन माझे आतुरले रे !


 

जेजे कळावे या मर्त्य जगाचे, तेते सर्व मज कळले रे

कोलाहलात या आयुष्याच्या,मम आयुष्य सारे विरले रे

उरले फक्त आता नाते तुझे नी माझे, ते कळायचे उरले रे

पुळणीवर पाऊले दिसली तुझी, परी सानिध्य तुझे जाणवले रे

सुगंध तुझा दरवळुन सभोवर,वारा घेऊन वाहे रे

अंधाऱ्या वाटेवरती टाकतो कोण चांदण्यांचा प्रकाश रे

ठेच लागून डळमळतांना,अवचित कोणाचा हा आधार रे

वाटले कितीदा तुज ओळखतो मी,ते स्वप्न आता विरले रे

सांग तुच मज माझा कोण तू,मन माझे आतुरले रे

मन माझे आतुरले रे !

 

१९/०४/२५ १२:२८ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment