Tuesday, 31 March 2026

शोध


डोळ्यांत दाटते काही, कारण कधी कळेना,
मन मात्र भटकत राहे, थांबणं त्याला जमेना…

वाटेवर चालताना, वाटच नवी फुटेना,
हातात येतं काही, तरीही काही मिळेना…

कधी शांत दर्याशी बसून राहावंसं वाटे,
लाटांच्या कुजबुजीत काही ऐकू येईना…

स्वतःलाच विचारताना शब्दच हरवून जातात,
उत्तरांच्या या गर्दीतही माझे उत्तर सापडेना…

हळूच काही विरघळे, कळतही नाही केव्हा,
रिकाम्या त्या जागी मन शून्यातही रमेना…

ना शेवट या शोधाचा, अन सुरुवात ही सापडेना,
मन तूषार्त का अधांतरी— अजूनही कळेना…

मंगळवार, ३१/३/२६ , २:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment