Thursday, 19 February 2026

पहाट



दुःखांची शृंखला, जशा पर्वतांच्या राशी,
सुखांच्या सावल्याही नाही फिरकल्या मजपाशी।

चालत राहिलो जरी पायांत बोचले काटेच काटे,
मार्गांनी दिले मला फक्त जखमांचेच साठे।

चंद्रही रुसला, ताऱ्यांनीही मान फिरवली,
रात्रीच्या काळोखात माझी सावलीही हरवली।

गुंजार दाटला फक्त हुंदक्यांचा श्वासांत,
मीच माझी मूक कहाणी ऐकत राहिलो मनांत।

तरी अंतरी कुठेतरी धग एक जिवंत आहे,
काळोखाच्या गर्भातच पहाट दडून आहे।

गूरुवार, १९/२/२६ , १२:२० AM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment