Thursday, 18 July 2024

गुज


कितीदा तुज पाहुनी मन माझे झुरावे

कधी तुला गुज माझ्या मनीचे कळावे

का तु समोर येता ओठ माझे मिटावे

का मुखातून माझ्या शब्द ही फुटावे

का प्रितीच्या फुलाने आपल्या फुलावे

का फुलण्या आधीच ते कोमेजून जावे

स्वप्नांत अलगद जशी येतेस तू अवचित

आयुष्यात ही माझ्या तू का तसेच यावे

कितीदा तुझ्या आठवांचे क्षण येता

का डोळ्यांतून माझ्या आसवांनी झरावे 

प्रेमात तुझ्या मिळाले फक्त दुःख पदरी

का तरीही मी वेदनेस या बिलगून राहावे  

 

गुरुवार १८//२०२४ , ११:०६ PM

अजय सरदेसाई (मेघ)


(Inspired from the song "कितीदा नव्याने तुला" from the marathi movie "ती सध्या काय करते")

No comments:

Post a Comment