Friday, 19 April 2024

निवाल्या सर्व वृत्ती


निवाल्या सर्व वृत्ती ,ईच्छांचा पाचोळा झाला

पेटवला अग्नी मनांत आणि तो कचरा राख केला

आत्म सुखात नग्न न्हाऊन मी लूटला स्वानंद

नको नको ते जोपासले वृत्तींनी माझ्या छंद

पुळणीवरून चालतांना मागे वळुन पाहिले

पाऊल खुणा पाहुन माझ्या, मनी वैराग्य दाटले

मेघ गर्जना आसमंती,मग अश्रू डोळ्यांत माझ्या का दाटले

अलवार आनंद-स्मित मी हळुच, का सर्व सद जनांत वाटले

आयुष्याच्या या वळणावर नको अहिकाचा बडिवार आता

चरणांशी तुझ्या आलो नाथा, नोको लोटूस मज तू दूर आता

 

शुक्रवार  १९/०४/२०२४   ०३:३० PM

अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment