Monday, 26 February 2024

कृष्ण "मेघ"


 

मी कृष्ण "मेघ", आकाशी विहरुन झाले।

बरसुन आसमंती ते विरणे जगुन झाले।।


भिरभिरला हळुवार नभातून थंड शांत वारा।

गहिवरला नकळत "मेघ",आकाश फिरुन झाले।।


डोंगर दऱ्यां शी माझे आजन्म मैत्र आहे।

त्या दाट हिरवळीशी हितगुज करुन झाले।।


त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।

मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।


आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।

फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।

 

सोमवार, २६//२०२४ , :५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment