Wednesday, 14 January 2015

तुझी आठवण


काळाच्या पद्याआड गेलेली तुझी आठवण आज पुन्हा डोकावली

वाटलं ही नव्हता कधी कि तू पुन्हा येशील !

तरी आलीस .......आठवणींतून

खूप दूरवर आलो होता मी तुझ्यापासून ...... चालता चालता

मागे वळून पाहिलं , तू नव्हतीस कुठेच !

फक्त मीच ........ एकटा

आज अचानक आले भरून डोळे

म्हणून मिटल्या पापण्या

आवरण्यासाठी अश्रू

त्या मिटलेल्या पापण्यां समोर तूच होतीस

अश्रूंचा बंद तुटला होता ......

 

अजय सरदेसाई (मेघ)

२७/0३/१९९५


No comments:

Post a Comment