Wednesday, 4 September 2013

मेघ



श्रावणात बरसून मेघ आता दमलाय 
आकाशाश्या कुशीत श्रमून आता निज्लाय.
ज्यासाठी केला एवडा अट्टाहास 
त्याचे काही न झाले चीज
पाणी वाहून गेले सारे धरा उरली वांझ तशीच 
अंकुरले न एकही बीज .
तरीही समजू नका मेघ आता संपलाय 
नव्या उमेदी घेवून तो पुन्हा परतलाय 
पुन्हा जेव्हा येईल श्रावण ,मेघ पुन्हा बरसेल 
निळ्या झऱ्यांच्या ओठांतून गीत पुन्हा उमटेल 
या वेळी बोडक्या धरेची हिरवी होईल काया
पाणी मुरेल धारतीत श्रम न जातील वाया
ह्या वेळी त्याच्या श्रमांचे नक्की होईल चीज ,
एक नव्हे , चोहीकडे अनेक अन्कुरतील बीज

अजय सरदेसाई (मेघ)
19/09/1994                                         2:55 PM

No comments:

Post a Comment