Friday, 30 May 2025

बकुळीची फुले





बकुळी च्या गर्भातुन ऊठला मोहक परिमळ 

बकुळीस ना ज्ञान त्याचे ना कसली कळकळ

बकुळीचा परिमळू झुळकला अवचित अळुमाळू

वाळल्या बकुळ पाती तरी उरला तो परिमळ


म्हणे, मरावे परी किर्ती रुपे उरावे

भगवंताच्या भक्तित जिवाने जगावे

नाही आशा नाही कांक्षा मात्र नित्य उमलावे

बकुळीच्या फुला सारखे आपण जगावे

 शुक्रवार,३०//२०२५ , ०१:४० PM

अजय सरदेसाई  (मेघ)