प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday 8 September 2013

एका प्रेमाची गोष्ट



विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा

जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा

आठवतो मज दिवस तो पहिलाजेव्हा आवळा परिचय झाला

परिचयाच्या वाटेवरुनी,प्रेमाचा अंकुर उमलला

प्रेमाचा हा अंकुर बहरला,बाहेरून शुभमंगल झाला

आठवतो मज अजून सारखा,मिलनाचा तो क्षण पहिला

प्रेमाचा हा तरु मोहरलाआल्या त्याला नव्या पालव्या

आठवतो अजून दिवस तो मजला,दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला

सुखी आपला संसार चांगला,नजर लागली कसा बिघडला

गेलीस  तू सोडून अर्ध्यावरजो सुंदर आपला डाव मांडला

तरीही हा चिमणा एकाला,पाखरांसाठी जगाला श्रमला

उडुनी गेली पाखरें,आता चिमणा राहिला  एकला

विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा

जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा

 

अजय सरदेसाई (मेघ)

१४/०९/१९९४ , ०८:३० PM

Thursday 5 September 2013

उलटा पालट


शब्द


शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार ,शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार 
शब्दांनी केले शब्दांना साकार ,शब्दांनीच दिला शब्दांना आकार 
शब्दांची घरटी शब्दांचा संसार ,शब्दांनीच केला शब्दांचा संहार 
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी कधी शब्दांची कोटी 
शब्दांचा आभास निश्वास शब्दांचा ,शब्दांचेच प्रेम दुस्वास शब्दांचा 
शब्दांनीच घातल्या टोप्या शब्दांना , शब्दांचीच मात्र लागू पडे शब्दांना 
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मिंदे आहेत शब्द अव्यक्त 
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द 
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची 
शब्द "पुढे" शब्द "मध्ये" नी "मागे" शब्द 

बुधवार दिनांक : ०१/०२/१९९५    , ०१:२० AM
अजय सरदेसाई (मेघ ) 

Wednesday 4 September 2013

चारोळ्या



त्यावेळी जिकडे तिकडे चारोळ्यांचे पेव फुटले होते . जोतो चारोळ्या करत फिरत असे. चारोळ्या मित्रांना म्हणून दाखवत असे . काही ओरिजिनल असत , काही इन्स्पायरड असत , तर काही चक्क कॉप्या असत व आपल्या नावावर खपवल्या जात . पण तरीही चारोळ्या ऐकण्यात , करण्यात आणि मित्रांमध्ये ऐकवण्यात एक वेगळीच मौज असे . अशाच त्या मंतरलेल्या कॉलेज च्या दिवसांत काही  सुचलेल्या ,काही इन्स्पायरड चारोळ्या फक्त तुमच्या साठी . ओडून  ताणून  कलेल्या ,काही र ला र , ट ला ट  जोडून जुळवून आणलेल्या, तर काही सरस जमलेल्या . पहा आवडतात का ! नाही आवडल्या तरी चारोळ्याच त्या , टाईम पास झाल्याशी कारण ........ काय ?


चारोळ्या.......

20/09/1994                         12:30 PM
राम हि खोटा होता , खोटी त्याची कहाणी . ते संत हि खोटे होते , खोटी त्यांची वाणी ,
फक्त मृत्यूच एक सत्य या जगात ,हे जीवन मात्र  , आळवा वरचे पाणी !

20/09/1994                         6:55 PM
वैरयांच्या शब्दात आज मध मिसळलाय!,बाभळीच्या काट्यात आज गुलाब उमलाय !
सुर्य उगवलाय आज कुणीकडे ?अबोलीत आज सुगंध फुललाय !

20/09/1994                         10:45 PM
ओठांत  मदिरा अन नैन शराबी ,जीवनात नाही या काहीच खराबी .
आकंठ पिऊ दे मज जीवनाचा प्याला ,गुत्यातून उठला खूप उशिरा हा शराबी .

21/09/1994                         12.30 AM
हि रात्र निळी चांदण्यांच्या शालूत आली. रातराणीच्या गंधात डुंबून आली .
फिरविला कुणिरे मनांत मोरपंख ?अन याद तुझी हळूच डोकावून गेली.

21/09/1994                         12:35 AM
जीवनीची रीत आशीच असते ,खिडकी पल्याड जग सुंदरच दिसते !
तो आहे अनाडी , सांग त्या  वेड्याला ,प्रत्येक पेल्यात एक वादळ असते !

21/09/1994                         12:50
त्यांनी मांडला शिक्षेचा बझार ,सिस्टम हा शिक्षणाचा जर्जर
पण कोण  तमा  बाळगतो याची ,नोकरी एक अन हजांरो बेकार

21/09/1994        3:20 PM
मेल्यावर मी बंधू नका बूथ ,आठवणी माझ्या ठेवू नका शाबूत
पण इतकेच करा दोस्तानो माझ्या साठी ,अस्थींची बनवून माझ्या विट , बसवा गुत्याच्या भिंतीत

21/09/1994              3:35 PM
विचारांच्या दुनियेत हरवलायेस दोस्त ,कवितांच्या दुनियेत रामलायेस दोस्त .
तू सोडून दे या भाकड कवी कल्पना ,खर्या दुनियेची ओळख विसार्लायेस दोस्त.

29/09/1994                         12:50 AM
हि वाट पायाखालची का कधी संपली आहे ? वाटेवरचा प्रत्येक मुसाफिर नेहमीच दमला आहे !
हि नाही वाट , तो आहे कालसर्प !वाटेतच वाटेने सर्वांना गिळले आहे !

31/01/1995                               9:30 PM
31/01/1995 
स्वप्नांना वास्तवाचा पायबंध  असतो
आनंदाला सतत दुखा:चा डंख असतो
नको होवूस तू या जीवनाला निराश
निराशेला आशेचा पंख असतो


Dreams are bound by chains of reality
Happiness is sprinkled with salts of sorrow
Never be downcast with life my friend
For hope comes on wings of morrow

31/01/1995                         9:35 PM
जीवन एक अथांग सागर आहे ,जगणे एक सागर सफर आहे
सफरीची सुरुवात आहे तुझा जन्म , सफरीच्या अंती मृत्यूची किनार आहे

01/02/1995        1:30 AM
शब्दांनी शब्द रेखा शब्दांच्या , शब्दांनीच शब्द उणे शब्दांना
शब्दांनीच शब्दांची शब्द भरारी ,शब्दांनीच शब्दांची किंमत शब्दांना

अजय सरदेसाई (मेघ)